Wednesday, October 16, 2024
Homeनाशिक‘निमा’च्या कार्यालयीन सचिवाविरुध्द तक्रार

‘निमा’च्या कार्यालयीन सचिवाविरुध्द तक्रार

सातपूर । प्रतिनिधी

‘निमा’मधील वादावर धर्मदाय उपआयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणी बाबत धर्मादाय आयुक्तांनी 29 तारखेला पुन्हा सुनावणी करण्याचा निर्णय दिला आहे.

- Advertisement -

त्याचवेळी विश्वस्तांना बजावण्यात आलेल्या नोटीसची तारखांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विश्व समितीने पोलीस ठाण्यात कार्यालयीन सचिवा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

निमामधील सत्तासंघर्ष या प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनंतर धर्मदाय उपायुक्तांच्या न्यायालयात 21 तारखेला सुनावणी ठेवण्यात आली होती. या पहिल्या सुनावणीला गैरहजर असलेल्या विश्वस्तांनी पुढील सुनावणीला हजर रहावे म्हणून धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडून नोटीस देण्यात आली होती.

मात्र या नोटीशीवरील तारखेत निमाच्या कार्यकारी सचिवाकडून फेरफार करण्यात आल्याची बाब उघड झाल्याने विश्वस्त समितीने सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तसेच न्यायालयीन कागदपत्रात फेरफार करून दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, धर्मदाय उपआयुक्त न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसाठी निमा विश्वस्तांनी हजर रहावे म्हणून नोटीस दिली होती. ही नोटीस 23 सप्टेंबर रोजी निमा कार्यालयास प्राप्त झाली. त्यानुसार विश्वस्त मंडळाला 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता धर्मदाय उपायुक्त न्यायालयात हजर होण्याचे निर्देश दिले होते.

मात्र निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे यांनी नोटीसमध्ये खाडाखोड करीत 24 तारखेच्या ठिकाणी 25 तारिख असा उल्लेख केला. त्यांचे हे कृत्य दिशाभूल करणारे असून, निवृत्त पदाधिकार्‍यांच्या दबावाखाली येवूनच हे सर्व केल्याचा आरोप विश्वस्तांकडून तक्रार अर्जात केला आहे.

तसेच सदर तारखेला आम्ही हजर राहू नये ज्यामुळे आमच्यावर कठोर कारवाई होईल या उद्देशाने हा सर्व खटाटोप करण्यात आला आहे. कारण आम्ही 24 सप्टेंबर रोजी उपस्थित न राहिल्यास आमचे न भरून येणारे नुकसान होणार होते व आमच्यावर कोर्टाचा अवमान केल्याची कारवाई सुद्धा होऊ शकली असती, असेही तक्रार अर्जात म्हटले आहे.

त्याचबरोबर न्यायालयीन कागदपत्रांमध्ये फेरफार करून सचिव देवरे यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे. ही बाब आम्ही धर्मदाय उपायुक्त यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. त्यामुळे संबंधितांसह निवृत्त पदाधिकार्‍यांना सक्त ताकीद देवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावर विश्वस्त समितीचे अध्यक्ष मनिष कोठारी, मंगेश पाटणकर, धनंजय बेळे, संजीव नारंग यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या