Monday, November 18, 2024
Homeनाशिकवेळूंजे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

वेळूंजे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळूंजे आश्रमशाळेतील मुख्याध्यापक पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मिलिंद जगन्नाथ घाटकर असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, नाशिक एज्युकेशन सोसायटीची त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळूंजे येथे आश्रमशाळा आहे,. याठिकाणी तक्रारदाराचे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या बिलाचे प्रस्ताव आदिवासी विकासच्या नाशिक येथील प्रकल्प कार्यालयात पाठवून मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक घाटकर याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देत तक्रार केली. यानंतर लाचलुचपतच्या सापळापूर्ण पडताळणीत मुख्याध्यापक घाटकर यांनी लाच मागितल्याचे पंचासमोर निष्पन्न झाले.

याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलाही शासकीय, निमशासकीय अधिकारी वा कर्मचारी लाच मागत असले तर १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या