Tuesday, June 17, 2025
Homeनाशिकमहिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करा; राष्ट्रवादीतर्फे आंदोलनाचा ईशारा

महिनाभरात रस्त्याचे काम पूर्ण करा; राष्ट्रवादीतर्फे आंदोलनाचा ईशारा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

पाटील नगर ते बडदे नगर १८ मीटर डीपी रस्तावरील (DP Road) एकूण लांबीतील काही भागांचे काम अद्याप झालेले नसल्याने महिनाभराच्या आता सदरहू काम पूर्णत्वास आले नाही तर

- Advertisement -

रस्त्यावर उतरून आंदोलन (agitation) छेडण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) शिष्ट मंडळाने मनपा आयुक्तांना (Municipal commissioner) निवेदनाद्वारे (memorandum) दिले.

पाटील नगर ते बडदे नगरच्या रस्त्याचे काम (road work) बऱ्याच दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याचे बरेचशे काम पूर्ण झाले असून रस्त्याचा काही भाग अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला नसल्याने याठिकाणी डांबरीकारण झालेले नाही.

याठिकाणी मोठ्याप्रमाणावर खड्डे (potholes) पडल्याने वाहनचालक अंतर्गत कॉलनी रस्त्यांचा वापर करत असल्याने येथील कॉलनी रहिवाशांना त्याचा मोठ्याप्रमाणावर त्रास होत असल्याने सदरहू प्रश्न महिनाभरात मार्गी लावा अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे (Nationalist Congress) तीव्रस्वरूपाचे आंदोलन (agitation) छेडण्यात येईल असा ईशारा मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांना देण्यात आला.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक अध्यक्ष अंबादास खैरे, बाळासाहेब गिते, मकरंद सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष तथा समता परिषद नवीन नाशिक अध्यक्ष अमोल नाईक, मुकेश शेवाळे, संतोष भुजबळ, कृष्णा काळे, हरीश महाजन, रवींद्र शिंदे,

सुनील घुगे, मंगला मोकळ, विशाल डोके, राहुल कमानकर, अक्षय पाटील, राजेंद्र काकळीज, शिवराज नाईक, नितेश भामरे, मुकेश झनके, कैलास धात्रक, अमोल पैठणकर, भूषण पाटील, गणेश आहेर, अशोक करंके, प्रमोद नानकर, गौरव पाटील आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस समता परिषद व नाईक नगर मधील नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चीफ

मोठी बातमी! इस्राईलचा इराणला आणखी एक दणका; चीफ ऑफ आर्मी स्टाफ...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi इस्राइल आणि इराण यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात इस्राइलने इराणमधील...