Friday, April 25, 2025
Homeजळगावगुलाबराव देवकरांची धरणगावात प्रचाराची सांगता

गुलाबराव देवकरांची धरणगावात प्रचाराची सांगता

जळगाव । प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव शहरात रॅलीद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निवडणूक प्रचाराची सांगता करताना मतदारांना विजयी आशिर्वाद देण्याचे आवाहन यावेळी श्री.देवकर यांनी केले.

मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर धरणगाव शहरातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी श्री देवकर यांनी अखेरच्या दिवशी प्रचार रॅली काढली. हेमगंगा निवासापासून सुरू झालेली रॅली बसस्थानक, अर्बन बँक, धनगर गल्ली, पिल्लू मशीद, महावीर चौक, धरणी चौक, नटराज पान, बजरंग चौक, हनुमान नगर, भोईवाडा, बालाजी मंदिर, राजपूत समाज मंगल कार्यालय, जांजी बुवा, फुलहार गल्ली, मोठी मढी, रामलीला चौक, मशीद असी. पाताल नगरी, गबानंदा चौक, माळी व पाटील लोकांची मढी, तेली विहीर, कोट बाजार, बेलदार गल्ली मार्गे परिहार चौकात पोहोचली.

- Advertisement -

त्याठिकाणी रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर श्री.देवकर यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. धरणगाव शहरातील पाणी प्रश्न व अवैध धंदे सर्वांच्या टीकेचा प्रमुख मुद्दा होता.

यांची होती उपस्थिती- राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक भास्करराव काळे, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, उद्योजक सुरेश चौधरी, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, तालुका प्रमुख जयदीप पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील, पाळधीचे माजी सरपंच दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, बाजार समिती संचालक दिलीप धनगर, रंगराव सावंत तसेच डॉ.नितीन पाटील, प्रा.एन.डी.पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...