Saturday, July 27, 2024
Homeनाशिकजिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 9 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 9 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत शनिवार, 9 सप्टेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीतून वाद मिटविण्यासाठी तडजोड झाल्यास वादास कायमस्वरुपी पूर्णविराम मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त संबंधित पक्षकार, वकील वर्ग, वकील संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांनी लोकअदालतीत सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी केले आहे…

- Advertisement -

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होणाऱ्या लोकअदालतीत वसुलीची प्रकरणे, फौजदारी, विद्युत चोरीची तडजोड पात्र प्रकरणे, भूसंपादन, अपघात विमा, वैवाहिक, धनादेश अनादराचे प्रकरणे, मिळकत व पाणी कर वसूलीची ग्रामपंचायत व महानगरपालिकेतील प्रकरणे, भारत संचार निगमची वसूली, विविध बँक व वित्तीय संस्थांची वसूली अशी एकूण 24 हजार 979 प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. तसेच ग्रामपंचायत, महावितरण, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँक, दूरध्वनी थकीत रक्कम वसूलीची व इतर खाजगी कंपन्यांची प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे अशी एकूण एक लाख 595 दाखलपूर्व प्रकरणे या लोकअदालतीत ठेवण्यात आली आहेत.

Maratha Andolan : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढला तीन पानी जीआर; मनोज जरांगेंना केली ‘ही’ विनंती

या प्रकरणांच्या तडजोडीसाठी जिल्हा न्यायालय, नाशिक रोड, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय, औद्योगिक/कामगार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, सहकार न्यायालय, मोटार वाहन न्यायालय इत्यादी ठिकाणी पॅनल स्थापन करण्यात आले आहेत. तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत दाखल करण्यात आलेली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवण्यात आली आहेत. असे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. डी. इंदलकर यांनी सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Dahi Handi 2023 : दहीहंडी फोडताना मुंबईत दोन गोविंदा जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या