Monday, June 17, 2024
Homeनाशिकयेवल्यात प्रवाशांकडून वाहकाला मारहाण; गुन्हा दाखल

येवल्यात प्रवाशांकडून वाहकाला मारहाण; गुन्हा दाखल

येवला । प्रतिनिधी

- Advertisement -

येवला बस आगारात वाहकाना अज्ञात प्रवाशांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या प्रवाशांना अटक करा, अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्याने बसस्थानकावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, मारहाण करणाऱ्या प्रवाशा विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

थोड्या जागेवर तिकीट का काढले या कारणाचा राग येऊन एका अज्ञात एसटी प्रवाशाने वाहक दीपक अलगट आणि महिला वाहतूक निरीक्षक अर्चना दानी यांना मारहाण केली. तर ओळखीचे व्यक्ती व महिला आणून बस स्थानक परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

सदर घटना शनिवारी, सायंकाळच्या सुमारास घडली. सदर घटनेने बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एसटी कर्मचारी संघटनेने दोषी प्रवाशांवर कारवाई करावी, अन्यथा चक्काजाम आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. दरम्यान, मारहाण करणाऱ्या प्रवाशा विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या