Saturday, May 4, 2024
Homeजळगावबदल्या न करण्याच्या आदेशाने जिल्हा प्रशासनात उडाला गोंधळ

बदल्या न करण्याच्या आदेशाने जिल्हा प्रशासनात उडाला गोंधळ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

तब्बल दोन वर्षांनंतर महसूल आणि पोलीस प्रशासनामध्ये (Revenue and Police Administration) बदल्यांचा (transfer) बार उडाला. काल दि. 26 रोजी महसूल प्रशासनातील 111 विविध संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश (Order of transfer) पारीत झाले आहे. तसेच पोलीस प्रशासनातही 490 बदल्या प्रस्तावित आहेत. काल बदलीचे आदेश झाले, आणि शासनाने 30 जून पर्यंत कोणत्याही बदल्या करु नये, असा अध्यादेश शुक्रवारी काढला. या अध्यादेशामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात पुरता गोंधळ (Confusion) उडाल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisement -

कोरोनामुळे दोन वर्ष बदली प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र आता कोरोनाची परिस्थिती निवडल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून गेल्या 15 दिवसांपासून बदल्यांचे वारे वाहू लागले होते. जिल्हा प्रशासनात 100 हून अधिक बदल्या (transfer) प्रस्तावित होत्या. अव्वल कारकून पदापासून ते वाहनचालक पदापर्यंतच्या संवर्गातील बदली प्रक्रिया सुरु होती.

यंदा, बदल्या होणार आणि इच्छित स्थळी जायला मिळणार, याची उत्सुकता कर्मचार्‍यांना लागून होती. बदल्या पारदर्शी पध्दतीने व्हाव्या म्हणून, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी समुपदेशनाची(Counseling) पध्दत अमलात आणली. त्यानुसार कर्मचार्‍यांच्या समुपदेशानातूनच दि. 26 रोजी महसूल कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश पारीत करण्यात आले यात 71 अव्वल कारकून, 13 मंडळ अधिकारी आणि सात वाहनचालक अशा एकूण 111 जणांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. समुपदेशनातून झालेल्या या बदल्यांमुळे (transfer)कर्मचार्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. तर काहींचा हिरमोड देखील झाला होता.

महसूल प्रशासन संभ्रमात

महसूल प्रशासनाने गुरुवारी बदल्यांचे आदेश काढले आणि शुक्रवारी अध्यादेश धडकला. ज्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांना नियुक्तस्थळी कार्यमुक्त करावे की नाही, अशा पेचात जिल्हा प्रशासन पडले आहे. तसेच कर्मचारीदेखील नियुक्त स्थळावर जायचे किंवा नाही यावरुन ते देखील संभ्रमात (Confusion) आहे.

अध्यादेश धडकताच हिरमोड

महसूलात काल बदल्यांचे आदेश निघाले आणि शुक्रवारी सांयकाळी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सन 2022-23 या आर्थिक वर्षी दि. 30 जून पर्यंत बदल्या करण्यात येवू (non-transfer order )नये. असा अध्यादेश येवून धडकला. हा अध्यादेश धडकताच महूसल प्रशासनातील कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला.

पोलिसांच्याही बदल्या प्रस्तावित

पोलीस प्रशासनातही (Police Administration) यंदा 490 हून अधिक बदल्या प्रस्तावित आहेत. यात एकाच ठिकाणी पाच वर्ष पूर्ण झालेले 417 कर्मचारी, एकाच तालुक्यात खंडीत, अखंडीत सेवा बजाविलेले 77 कर्मचारी, नेटीव्ह 98, विनंती अर्ज 490 बदल्या प्रस्तावित आहेत.

शासनाने काढलेल्या अध्यादेशासंदर्भात मंत्रालयातून मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. शासनाने सांगितल्यानुसारच मार्गदर्शन आल्यानंतर पुढील आदेश होतील अन्यथा नव्याने प्रक्रिया करावी लागेल.

-अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या