Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशRajasthan Assembly Elections : काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत, पायलट, वसुंधरा राजे...

Rajasthan Assembly Elections : काँग्रेस-भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर; गेहलोत, पायलट, वसुंधरा राजे ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

नवी दिल्ली | New Delhi

देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरोम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) होत असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने (Congress) राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे….

- Advertisement -

Gaganyaan Mission Test : इस्रोचे मोठे यश! ‘गगनयान’ अवकाशात यशस्वीपणे झेपावलं

काँग्रेसने आज जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ३३ जणांचा समावेश असून सध्या आमदार (MLA) असलेल्या ३० जणांना मैदानात उतरविण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत सदारपुरा, सचिन पायलट टोंक मतदारसंघातून निवडणूक लढवतील. तर सीपी जोशी नाथद्वारा, दिव्या मेहरा ओसीयन, गोविंद सिंह डेटासरा यांना लाछेमानगडमधून निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. तसेच सादुलपूर येथून कृष्णा पूनिया यांना उमेदवारी देण्यात आली असून लाडनूं येथून भाकर यांना उमेदवारी मिळाली आहे.

Raj Thackeray : “बेडरुमच्या मधोमध पलंग अन्…”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘तो’ किस्सा सांगताच पिकला हशा

दुसरीकडे भाजपकडून राजस्थानसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje) यांचा समावेश असून त्यांना झलारपटन मतदारसंघातून निवडणूक लढवतील. तर राजेंद्र राठोड तंरगपूरमधून आणि ज्योती मिरधा या नागपूरमधून निवडणूक लढवतील. भाजपच्या दुसऱ्या यादीत ८३ उमेदवारांचा समावेश आहे. यात भाजपने १० महिला उमेदवारांना संधी दिली आहे. तसेच वसुंधराराजे यांच्या गटातील अनेक नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात प्रताप सिंह सिंघवी, अशोक डोगरा, नरपत सिंह राजवी, श्रीचंद कृपलानी, कालीचरण सराफ, कैलाश वर्मा, सिद्धी कुमारी, हेम सिंह भडाना, अनिता भदेल, कन्हय्यालाल यांचा समावेश आहे.

दरम्यान, यंदा राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप (Congress and BJP) यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्यामुळे उमेदवारांच्या निवडीत अधिक चुरस निर्माण होत आहे. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान (Voting) होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून आता या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या ‘त्या’ विधानावर मनोज जरांगे पाटलांचे चोख प्रत्युत्तर, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या