Tuesday, June 25, 2024
Homeदेश विदेशकॉंग्रेसला मोठा धक्का! उमेदवाराने लोकसभेचे तिकीट केले परत

कॉंग्रेसला मोठा धक्का! उमेदवाराने लोकसभेचे तिकीट केले परत

कारणही सांगितलं

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू असून प्रचाराच्या माधमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. तर काही ठिकाणी अनेकजण उमेदवारी मिळविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. पंरतु, त्यांना उमेदवारी मिळताना दिसत नाहीत. मात्र, दुसऱ्याच उमेदवाराला तिकीट मिळताना दिसत आहे. अशातच आता कॉंग्रेसच्या (Congress) एका उमेदवारांने चक्क लोकसभेची मिळालेली उमेदवारी पक्षाकडे परत केली आहे. उमेदवारी परत करताना या उमेदवाराने कारण देखील सांगितले असून सदर घटनेमुळे मात्र, काँग्रेसवर नामुष्की ओढवल्याचे दिसून आले आहे.

ओडीसा राज्यातील (Odisa State) पुरी लोकसभा (Puri Loksabha) मतदारसंघातून कॉंग्रेसने सुचरिता मोहंती (Sucharita Mohanty) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी “पक्ष मला निधी देऊ शकला नाही म्हणून मी उमेदवारी परत केली आहे. तसेच या लोकसभा मतदारसंघातील सात विधानसभा मतदारसंघांमधील काही जागांवर विजयी उमेदवारांना उमेदवारी दिलेली नाही. त्याऐवजी, काही कमकुवत उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मला अशा परिस्थितीत प्रचार करणे शक्य वाटत नाही”, असे म्हटले आहे.

तसेच मोहंती यांनी पुढे म्हटले की, “जेव्हा मी माझी उमेदवारी पक्षाकडे (Party) परत केली तेव्हा मला पक्षाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाकडून निधी मिळत नसल्याने पक्षाने मला स्वतःचं निधी उभा करण्यासाठी सांगितले. तसेच पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी माझं बोलणंही झाले नाही. मी पक्षाकडे विधानसभेच्या जागांवर चांगले उमेदवार द्यावेत अशी मागणी केली होती. मात्र, पक्षाने त्याची दखल घेतली नाही, असंही त्या म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या