Friday, July 24, 2026
Homeनगरसर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच...!; काँग्रेसचा आ. सत्यजित तांबेंना टोला

सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच…!; काँग्रेसचा आ. सत्यजित तांबेंना टोला

मुंबई | Mumbai

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण पुन्हा तापले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत, सर्जेराव, ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करू नये, असा टोला लगावला आहे.

- Advertisement -

काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधत, 2023 मध्ये पारित झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी का होत नाही, हे आ. तांबे यांनी विचारावं असंही म्हटलं आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, भारत महिलांच्या हक्कांबाबत प्रगतिशील राष्ट्र बनण्यामागे काँग्रेसच्या सत्ताकाळातील निर्णय महत्त्वाचे होते. स्वातंत्र्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार विनासंघर्ष देण्यात आला, जो काँग्रेसच्या धोरणांचा परिणाम होता, असंही पक्षानं स्पष्ट केलं.

तसेच 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियमम काँग्रेसच्या पाठिंब्यामुळेच पारित झाल्याचा दावा करत, त्याची अंमलबजावणी का होत नाही, यासाठी भाजपला प्रश्न विचारावा, असे काँग्रेसनं म्हटलं आहे. आ. तांबे यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत अपयशी ठरल्याबद्दल खेद व्यक्त करत, हा भारतीय महिलांसाठी दुर्दैवी दिवस असल्याचे म्हटले होते. तसेच भारत महिलांच्या हक्कांबाबत प्रगतिशील देश असल्याचे नमूद करत, संविधानातील समानतेच्या तत्वांवर देश पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....