Saturday, May 25, 2024
Homeनाशिकबलात्काराची सी.बी.आय. चौकशीची कॉंग्रेसची मागणी

बलात्काराची सी.बी.आय. चौकशीची कॉंग्रेसची मागणी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने उत्तर प्रदेश, हाथरस येथील २० वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची जीभ कापली. दवाखान्यात उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून आरोपींना फाशी द्यावी , अशी मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगीं भाजपा सरकारच्या काळात दलित समाजातील लोकांवर सातत्याने हल्ले, हत्या, बलात्कार, सामुहिक मारहाण आदी घटना सातत्याने घडत आहेत.

एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून जीभ कापुन टाकणं ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय आणि देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना असुन हृया घटनेचा नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश पदाधिकारी सूरेश मारु, रमेश साळवे, अशोक शेंडगे, अँँड.विकास पाथरे, विलासराज बागुल, मनोहर अहिरे, सुरेश पवार, सुरज परदेशी, राजु कानडे, केतन रेवर, संतोष वाघमारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या