Thursday, June 11, 2026
HomeनगरShrirampur News : काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; माॅर्निंग वाॅकला गेल्यानंतर जबरदस्तीने...

Shrirampur News : काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण; माॅर्निंग वाॅकला गेल्यानंतर जबरदस्तीने गाडीत घातलं

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर यांना आज सकाळी काही समाजकंटकांनी बळजबरीने गाडीत घेऊन जाऊन दुधाळ वस्ती परिसरात मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार हेमंत ओगले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते.

- Advertisement -

सचिन गुजर हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वाकला जात असताना रस्त्यामध्येच दोन जणांनी त्यांना बळजबरीने गाडीत बसवले. दुधाळ वस्ती परिसरात नेत त्यांना मारहाण केली आहे. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, सदर आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

या घटनेची कोणत्याही शब्दात मांडणी करणे अशक्य आहे. यापूर्वी या शहरात असे कधीच झाले नाही. निवडणूक कोणत्या थराला टोकाला जात आहे त्याचे हे ट्रेलर म्हणावे लागेल. कुणी सुपात असेल तर कोणी जात्यात… एक मात्र नक्की श्रीरामपुरात जे घडतंय ते निशब्द आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...