नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेसमधील (Congress) नाराज 23 गटाचे सदस्य माजी मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाच्या धोरणांचे कान पिरगळण्याची प्रक्रीया कायम राखली आहे. यावेळी त्यांनी थेट अध्यक्षपदावरून मत नोंदविले आहे. आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्षही नाही. सोनिया गांधी (Sonia Gandhi) हंगामी अध्यक्ष आहेत. इतका मोठा इतिहास असणारा राजकीय पक्ष अध्यक्षांविना पुढील वाटचाल करु शकणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रातील राजकारणात (Central Politics) सततच्या अपयशामुळे काँग्रेसमध्ये (Congress) अलिकडे नाराजी आणि बंडखोरीचे सूर वाढले आहेत. गेल्या दोन वर्षात अनेकदा याची प्रचिती कार्यकर्त्यांनी घेतली. पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्यापासून हा सिलसिला वाढला आहे. कपिल सिब्बल (Kapil Sibal) आणि गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी अनेकदा पक्षाची चिंता वाहताना नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी पुन्हा एकदा सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वावरून निशाणा साधला आहे.
…तेव्हा नारायण राणे, दानवे गप्प का?; मराठा आरक्षणावरून राऊतांचा निशाणा
नाराज नेत्यांनी सुचविलेल्या सुधारणा अद्याप झाल्या नाहीत याबद्दल मला खंत आहे. पक्षाचा 125 वर्षांचा इतिहास आहे आणि गेल्या दोन वर्षात पक्षाकडे अध्यक्ष नाही. अध्यक्षांशिवाय पक्षा पुढे कसा जाणार हे मला माहिती नाही. यामुळे मलाही वाईट वाटतं. मी कोणाच्या विरोधात बोलत नाही. पण पक्षाकडे अध्यक्ष हवा. आम्ही मात्र काँग्रेस पक्षासाठी (Congress Party) लढा सुरु ठेवू असा निर्धारही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
एका इंग्रजी मासिकाशी बोलताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्रातील मॉडेलवरही भाष्य केलं. महाराष्ट्रातील मॉडेलदेशभरात राबवण्याच्या प्रस्ताव पवारांनी दिला आहे. यावर सिब्बल म्हणाले, 523 मतदारसंघांमध्ये हे अशक्य आहे. पण आम्ही 400 उमेदवार दिले तरी भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही. आम्हाला अशाच पद्धतीने एकत्र काम करावं लागेल. विरोधकांमध्ये मतांतर येऊ फूट पडू शकते. पण प्रयत्न करायला हरात नाही. कारण शेवटी आपल्याला देशाचा नाश करणार्यापासून देशाला वाचवायचं आहे.