Monday, May 20, 2024
Homeदेश विदेश“दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन…”; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

“दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन…”; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सॅम पित्रोदा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान विधान केल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून चौफेर टीका केली जात आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले आहे. भारताच्या विविधतेबद्दल बोलताना सॅम पित्रोदा यांच्या अशा वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सॅम पित्रोदा यांच्या या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पार्टीतील अनेक नेत्यांनी पित्रोदा, काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका प्रचारसभेत म्हणाले, राहुल गांधींच्या निकटवर्तीयांनी भारतीयांना आफ्रिकन संबोधून एकप्रकारे शिवी दिली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यांनी मारली सामूहिक दांडी; ७८ उड्डाणं रद्द

दरम्यान, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसवर टीका होत असताना यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी पित्रोदा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारी एक पोस्ट एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, सॅम पित्रोदा यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतातलं वैविध्य सांगताना ज्या प्रकारची तुलना केलीय ते दुर्दैवी आणि स्वीकारण्यासारखं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अशा उपमा आणि वक्तव्यांशी कोणताही संबंध नाही.

सॅम पित्रोदा काय म्हणाले?
ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत, असे धक्कादायक विधान सॅम पित्रोदा यांनी केले आहे. “आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो. गेल्या ७५ वर्षात प्रत्येकाला जगता येईल असे चांगले वातावरण आपण निर्माण केले आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भाऊ-बहिण आहेत,” असे सॅम पित्रोदा यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या