Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराजीनाम्याचे वृत्तावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राजीनाम्याचे वृत्तावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान आता त्यांनी या वृत्तावर मौन सोडले आहे. राजीनामा दिला नसल्याचे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी याविषयी भाष्य केले. बाळासाबेत थोरात यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेत नाराजी जाहीर केल्याचंही बोलले जात होते.

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘“मी दिल्लीत गेलो त्याचा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही. माझे दर महिन्याला काही विषय असतात त्यांची चर्चा करण्यासाठी गेलो होतो. मलाही दिल्लीतच ही बातमी समजली. माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्री या जबाबदाऱ्या असून दिल्लीत जाऊन योग्य प्रकारे त्या सांभाळेन असे सांगितले होते. पण तरीही तुम्हाला आणखी कोणती जबाबदारी द्यायची असेल तर माझी हरकत नसल्याचेही ते म्हणाले होते. ऑक्टोबर महिन्यातदेखील मी कोणत्या जबाबदारीचे विभाजन करायचे असेल तर हरकत नसल्याचे स्पष्ट केले होते. एच के पाटील काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी झाले. यानंतर त्यांनाही मी ही वस्तुस्थिती सांगितली. मात्र अचानक हा मुद्दा का आला याची कल्पना नसल्याचेही ते म्हणाले.’

- Advertisment -

ताज्या बातम्या