Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBalasaheb Thorat : राज ठाकरेंच्या 'त्या' विधानानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची साद

Balasaheb Thorat : राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची साद

मुंबई | Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) मनसेचा (MNS) आज मुंबईत पहिलाच कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जोरदार भाषण करत विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat ) यांचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरही भाष्य केले. ते म्हणाले की, संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा संपर्क आणि काम आहे. गेल्या सात निवडणुकांमध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. मात्र यंदा त्यांचा दहा हजार मतांनी पराभव झाला. लोकांनी मतदान केले, पण केलेले मतदान कुठे तरी गायब झाले, असे म्हटले होते. त्यावर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे.

- Advertisement -

यावेळी थोरात म्हणाले की,”विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhansabha Election) ‘ईव्हीएम’ घोटाळ्याबाबत (EVM Scam) सर्व विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे समाधानकारक उत्तर निवडणूक आयोगाकडून मिळालेले नाही. विशेषता काँग्रेस नेते (Congress Leader) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत ९६ लाख मतदारांची संख्या वाढली. हे सप्रमाण मांडले होते. आज राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे ‘ईव्हीएम’ विरोधातील आंदोलनाला बळ मिळणार आहे”, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या वक्तव्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी स्वागत केल्याचे दिसत आहे.

ते पुढे म्हणाले की, “लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी असून सध्या लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आले पाहिजे. दर निवडणुकीत मला ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य राहिले आहे. मात्र या वेळचा निकाल अनपेक्षित होता, जनतेलाही तो अनपेक्षित वाटला ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांनी माझा उल्लेख केला, माझ्याबाबत नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत हे संशयाचे वातावरण आहे. जे दिसतं ते वेगळं आणि घडलं मात्र वेगळं, याबाबतीत आम्ही अपील देखील केले होते. मात्र, अनेक बंधने घातली जात असून कुणीही माहिती द्यायला तयार नाहीत. त्यामुळे ही १०० टक्के संशयास्पद वस्तुस्थिती आहे”, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...