Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्यामोदी सरकारने 'इंडिया'चे नाव बदलले?; काँग्रेस नेत्याने ट्वीट करत व्यक्त केला संताप

मोदी सरकारने ‘इंडिया’चे नाव बदलले?; काँग्रेस नेत्याने ट्वीट करत व्यक्त केला संताप

नवी दिल्ली | New Delhi

केंद्र सरकारने भारतीय संविधानातून ‘इंडिया’ शब्द हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्याची बातमी नुकतीच माध्यमांमधून समोर आली आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. अशातच आता राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या जी २० परिषदेवेळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या रात्रीच्या जेवणाच्या (डिनर) निमंत्रण पत्रिकेवर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा शब्दप्रयोग केल्याने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

Accident News : पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

जयराम रमेश यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनाने ०९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या जी २० डिनरसाठी नेहमीच्या ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ यांच्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत. राज्यघटनेच्या कलम ०१ मध्ये ‘भारत, म्हणजेच इंडिया हा राज्यांचा संघ असेल’ असे लिहिले आहे. पण आता या माध्यमातून ‘संघराज्यांवरही’ही हल्ला होत आहे, असे ते म्हणाले आहेत.

I.N.D.I.A. विरोधात मोदी सरकारचा मास्टर प्लॅन; विशेष अधिवेशनात टाकणार ‘हा’ डाव

तर भाजप खासदार हरनाथ सिंह यादव यांनी म्हटले आहे की, आपण ‘इंडिया’ शब्दाऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरावा. इंग्रजांनी भारत हा शब्द शिवी म्हणून वापरला, पण ‘भारत’ हा शब्द आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. राज्यघटनेत बदल करून त्यात ‘भारत’ हा शब्द वापरला जावा, अशी माझी इच्छा आहे, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Maratha Andolan : शरद पवार यांनी सांगितला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला

दरम्यान, केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या कालावधीत सरकार संसदेत अनेक विशेष विधेयके मांडण्याची शक्यता आहे. भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकणे देखील मोदी सरकारच्या अजेंड्यामध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र, संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनाचा अजेंडा अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maratha Andolan : फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच; लाठीचार्जवरून शरद पवारांचा हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या