Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याIndia Alliance : 'इंडिया' आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या 'या'...

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai

- Advertisement -

देशात सध्या आगामी लोकसभाच्या निवडणुकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत असून त्यासाठी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएकडून (NDA) २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार (Prime Minister Candidate) नरेंद्र मोदीच असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. पण, एनडी विरोधात एकवटलेल्या विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता झालेली नाही.

नाशकात खुनाचे सत्र सुरूच; किरकोळ वादातून युवकाची हत्या

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या (India Alliance) पहिल्या दोन बैठका अनुक्रमे पाटणा आणि बंगळूरु (Patna and Bangalore) येथे झाल्या आहेत. त्यानंतर इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत (Mumbai) होणार आहे. मात्र, या बैठकीपूर्वीच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

“सनी देओलचा बंगला २४ तासांत वाचवला, मग नितीन देसाई…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

गेहलोत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांनी चर्चा आणि विचारविनिमय केल्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे असतील असे जाहीर केल्याची त्यांनी म्हटले.

उत्तर नाही, उत्तरदायित्वाची सभा! अजित पवारांच्या बीडच्या सभेचा टीझर लाँच, शरद पवारांचा फोटो वापरणे टाळले

पुढे बोलतांना गेहलोत म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. परंतु सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची आघाडी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी अहंकार करू नये, कारण २०१४ मध्ये भाजप केवळ ३१ टक्के मतांसह सत्तेत आला होता. उर्वरित ६९ टक्के मते त्यांच्याविरोधात होती. गेल्या महिन्यात बंगळुरू येथे इंडिया आघाडीची बैठक झाल्यापासून ‘एनडीए’ घाबरली आहे,” असेही गेहलोत यांनी नमूद केले.

MNS Jagar Yatra : रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा

तसेच गेहलोत यांना २०२४ च्या निवडणुकीत एनडीए ५० टक्के मतांसह सत्तेत येण्यासाठी काम करत असल्याच्या भाजपच्या दाव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे कधीच साध्य करू शकणार नाहीत. जेव्हा मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा ते हे करू शकले असते. त्यांच्या मतांची टक्केवारी कमी होईल आणि पंतप्रधान कोण होणार हे २०२४ च्या निवडणुकीचे निकाल ठरवतील. असेही अशोक गेहलोत यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Jejuri Khandoba Temple : जेजुरीला खंडोबारायाच्या दर्शनासाठी जाताय? मग ही बातमी वाचाच

- Advertisment -

ताज्या बातम्या