Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही..."; राहुल गांधींचे थेट...

Rahul Gandhi : “तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही…”; राहुल गांधींचे थेट केंद्र सरकारला आव्हान

नवी दिल्ली | New Delhi

संविधानाला (Constitution) ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत (Loksabha) चर्चासत्र सुरु आहे. या चर्चासत्रात आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सहभाग घेत मोदी सरकारवर (Modi Governtment) जोरदार निशाणा साधला. या चर्चेत बोलताना राहुल गांधी यांनी यावेळी ५० टक्के आरक्षण मर्यादा आणि जातीय जणगणना आम्ही लागू करून दाखवू, तुम्हाला जे करायचे आहे ते करून दाखवा, असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

यावेळी बोलतांना राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात द्रोणाचार्य आणि एकलव्यचा उल्लेख केला. ते म्हणाले की,”जसा द्रोणाचार्यांनी एकलव्याच अंगठा मागितला, तसं तुम्ही हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहात. देशातील सर्व उद्योग अदानी आणि अंबानींना (Adani and Ambani) दिले जात आहेत. भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे. शेतकऱ्यांऐवजी अंबानी, अदानी यांना फायदा पोहोचवला जात आहे, पेपर लीक सारख्या प्रकरणात युवकांचा अंगठा कापला जात आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.

YouTube video player

तसेच राहुल गांधी यांनी संविधानाच्या चर्चेच्या शेवटी बोलताना थेट केंद्र सरकारला चँलेज केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “इंडिया आघाडी (India Alliance) म्हणून आमचा पुढचा निर्णय हा जातीय जणगणनेचा असणार आहेत. आम्ही जातीय जनगणना लागू करण्याचा कायदा आणणार आहोत. तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मोडणार आणि जातीय जणगणना आम्ही करूनच दाखवणार, तुम्हाला जे करायचे ते करा”, असा इशाराच यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...