Saturday, May 4, 2024
Homeराजकीय…पण कोट्यवधी देशवासीयांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं

…पण कोट्यवधी देशवासीयांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं

दिल्ली । Delhi

देशातील करोना संसर्ग अद्यापही वाढतच आहे. देशातील एकूण रूग्णसंख्या १ कोटीच्यावर पोहचली आहे. १ कोटी करोनाबाधित रुग्ण असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे. देशातील वाढत्या रूग्णसंख्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, “देशातील करोना रुग्णांची संख्या १ कोटीवर तर जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांनी २१ दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा दावा केला होता. मात्र, अनियोजित लॉकडाऊनमधून ते साध्य झालं नाही. पण, देशातील कोट्यवधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या लॉकडाउनवर टीका केली आहे.

देशभरातातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटींच्या पुढे गेली आहे. मागील २४ तासांत देशात २५ हजार १५३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णसंख्येसह एकूण संख्या १ कोटी ४५ लाख १३६ वर पोहचली आहे. देशात सध्या ३ लाख ८ हजार ७५१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या