Saturday, July 27, 2024
Homeनाशिककॉंग्रेस नेते सचिन पायलट यांची त्र्यंबकेश्वर चरणी लीन

कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांची त्र्यंबकेश्वर चरणी लीन

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे | Trimbakeshwar

काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरास भेट दिली. श्रावण मास, सोमवती अमावस्या पर्वकाळ साधत त्यांनी पूजा अभिषेक केला. 

- Advertisement -

राजस्थानमधील जनतेचे कल्याण व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. त्र्यंबकेश्वर मंदिरात पुरोहित नाकिल यांनी पूजा केली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने सचिव श्रिया देवचके यांनी नेत्यांचे स्वागत केले.

कोण आहेत सचिन पायलट?

सचिन पायलट हे काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शाळेय शिक्षण नवी दिल्ली येथील हवाई दल बालभारती शाळेत होऊन बी.ए.(ऑनर्स) सेंट स्टीफंस्, दिल्ली विद्यापीठ मधुन केले. महाविद्यालय मध्ये असताना पायलट विद्यालय शुटिंग दलाचे कप्तान होते. त्यांनी एम.बी.ए. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ, अमेरिका येथील वारटन महाविद्यालयातून केले.

परदेशाहुन परतल्यावर १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. हा दिवगंत राजेश पायलट यांचा जन्म दिवस होता. या दिवशी मोठा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. १३ मार्च २००४ रोजी १४ व्या लोकसभेसाठी राजस्थानच्या दौसा मतदारसंघ पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडुन आले. वयाच्या २६ व्या वर्षी निवडुन आलेले पायलट हे भारताचे सर्वात लहान संसद सदस्य ठरले. पायलट ग्रह खात्याचे पार्लिमेंट स्टॅडींग समितीचे सदस्य आहेत. तसेच नागरी उड्डान खात्याच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. वयाच्या सव्विसाव्या वर्षी खासदार, चौतिसाव्या वर्षी केंद्रीय मंत्री, पस्तिसाव्या वर्षी प्रदेशाध्यक्ष आणि चाळिसाव्या वर्षी उपमुख्यमंत्री, अशी त्यांची कारकीर्द आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या