पुणे |प्रतिनिधी|Pune
देशात शब्द आणि संकल्पना मांडल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे लेखणी सत्ताधाऱ्यांच्या तलवारी बरोबर कशी लावू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केली.
पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने आयोजित केलेल्या लिटररी फेस्टिवलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शशी थरूर सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील एल्गार परिषदेच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या कारवाईवर भाष्य केले.
यावेळी थरूर म्हणाले की, मी शाळेत असताना लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते, असं शिकलो होतो. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती बघता यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण वरावरा राव, आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज आणि वर्णन गोन्साल्विस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांनी व्यक्त केलेल्या शब्द आणि विचारांमुळे सरकारने कारवाई केली आहे, असेही ते म्हणाले.
लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते, असे मी शिकलो होतो. मात्र, देशातील सध्याची परिस्थिती बघता यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. एल्गार परिषद प्रकरणात कार्यकर्त्यांवर हिंसा केली म्हणून नाही, तर त्यांनी व्यक्त केलेल्या शब्द आणि विचारांमुळे सरकारने कारवाई केली आहे,’ अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली.