Tuesday, March 25, 2025
Homeनगरकाँग्रेसच्या शिर्डी लोकसभा निरीक्षक आ. चौधरी नगरमध्ये

काँग्रेसच्या शिर्डी लोकसभा निरीक्षक आ. चौधरी नगरमध्ये

उत्तरेतील विधानसभा निवडणुकीचा घेणार आढावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक आ. रीटाजी चौधरी राजस्थानहून नगरमध्ये दाखल झाल्या आहेत. राजस्थान विधानसभेतील खंबीर नेतृत्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीन टर्म आ. रीटाजी चौधरी त्यांच्यावर उत्तरेतील शिर्डी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणार्‍या सहा विधानसभा मतदारसंघांच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

- Advertisement -

दरम्यान, आ. चौधरी यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक झाली. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ.लहू कानडे, घन:श्याम शेलार, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लताताई डांगे, प्रशांत दरेकर, दीप चव्हाण, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि उत्तर लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक संतोष हासे आदी उपस्थित होते. यावेळी आ.चौधरी म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली. विधानसभेतही चांगला परफॉर्मन्स द्याल, यात शंका नाही. संगमनेर आणि श्रीरामपूरच्या रूपाने काँग्रेस पक्षाकडे दोन लढवय्ये आमदार आहेत. महाविकास आघाडीमधील तीनही घटक पक्ष खांद्याला खांदा लावून काम करतील आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा प्रत्येक उमेदवार निवडून आणतील यात शंका नाही.

लवकरच त्यादृष्टीने आखणी करून तिन्ही पक्षांची एकत्रित बैठक घेऊन जागा निश्चित कराव्यात. तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी. बूथ लेवलच्या रचना करून घ्याव्यात. मित्र पक्षांनाही मदत व्हावी, यादृष्टीने रचना असावी. विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे आपल्याला सहज विजय मिळवता येईल अशी परिस्थिती आहे. सध्याच्या परिस्थितीत सत्ताधारी मारत असलेल्या भूलथापा आणि फसव्या योजनांचा बोजवारा जनतेसमोर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक मोहल्ला आणि चौका चौकात चर्चा घडवून आणाव्यात. सरकार विरोधी वातावरण अधिक तयार करावे. ज्याचा आपल्याला निवडणुकीत फायदा होईल असे त्यांनी म्हटले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष वाघ यांनी जिल्ह्यात माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी करत असून जिल्ह्यात नो व्हेअर झालेला पक्ष आता एव्हरी व्हेअर करण्यात यशस्वी झालो. यावेळी आमदार कानडे यांनी उत्तरेतील पक्ष अंतर्गत व्यूह रचनेचा लेखाजोखा मांडला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...