मुंबई | Mumbai
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेचा मृत्यू (Death) झाल्याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या महिलेचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन विरोधी पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून, काँग्रेसचे आमदार आणि विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावरच निशाणा साधला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मंगेशकर कुटुंब (Mangeshkar Family) ही लुटारूंची टोळी असून माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब आहे. मंगेशकर कुटुंबाने समाजासाठी नेमकं काय योगदान दिलं? कला क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमावले, पण समाजासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा दानशुरता फारशी दिसून आलेली नाही” असे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “ज्या खिलारे पाटलांनी दवाखान्यासाठी जमीन दिली त्यांना देखील सोडले नाही. माणुसकीच्या नावावर कलंक असणारे कुटुंब. तसेच सरकारने (Government) अशा प्रकरणांवर लक्ष देऊन, गरिबांचे (Poor) शोषण करणाऱ्या कोणत्याही घटकावर योग्य ती कारवाई (Action) केली पाहिजे” अशी मागणी देखील विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती (Pregnant) महिलेच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात समितीने म्हटले की, रुग्णालयाने गर्भवती महिला साडेपाच तास तिथे राहिली परंतु ती कोणतीही माहिती न देता निघून गेली. तसेच रुग्णालयाने रुग्णाला ‘गोल्डन अवर्स’ उपचार देण्याचा नियम पाळला नाही.