Sunday, November 24, 2024
Homeराजकीयकाँग्रेस आमदार थेट अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत; लवकरच पक्षप्रवेश?

काँग्रेस आमदार थेट अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत; लवकरच पक्षप्रवेश?

मुंबई । Mumbai

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा (NCP Jansanman Yatra) आज मुंबईत पोहचली आहे. या यात्रेत काँग्रेस (Congress) आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) उघडपणे अजित पवारांसोबत सहभागी झाले.

- Advertisement -

झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा होती. झिशान सिद्दीकी यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नाही मात्र ते उघडपणे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत सहभागी झाल्याने लवकरच ते राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहेत.

हे हि वाचा : सीमेवर जवानांचं रक्षाबंधन, मुस्लिम महिलांनी बांधल्या राख्या… पाहा VIDEO

दरम्यान नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे समोर आले होते. गुप्त मतदान असल्यामुळे आमदारांची नावं समोर आली नाहीत, मात्र काँग्रेसने अंतर्गत तपासातून सात जणांना ओळखल्याचं बोललं जात होतं. यात झिशान सिद्दीकी यांच्या नावाचाही समावेश होता. त्यामुळे झिशान हे कधीही पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

हे हि वाचा : उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावे लागले; शिंदेंचा गंभीर आरोप

झिशान सिद्दीकी यांचे पिता आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. सिद्दीकी ४० वर्षांहून अधिक काळ काँग्रेससोबत होते. मात्र त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेत बाबा सिद्दीकींच्या रुपाने राष्ट्रवादीला मुंबईत ताकद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या