Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे (Congress MP) नांदेडचे खासदार वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यावर (Nanded District) शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार राडा! ठाकरे गट-भाजप आमनेसामने

गेल्या काही दिवसांपासून वसंत चव्हाण आजारी असल्याने त्यांच्यावर हैदराबाद (Hyderabad) येथील किम्स रूग्णालयात (Kims Hospital) उपचार सुरु होते. काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली. त्यानंतर पहाटे ३ वाजता त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला.

हे देखील वाचा : विशेष मुलाखत : दै. ‘देशदूत’चा ५५ वा वर्धापन दिन 2024

दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याने त्यांना तातडीने हैदराबाद येथील किम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल मध्यरात्री त्यांची तब्येत अचानकपणे बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. 

हे देखील वाचा : PM Modi Speech : “महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत नव्या कायद्यात…”; पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द

वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.याशिवाय मे २०१४ मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अ‍ॅग्रीचे अध्यक्षही होते.नांदेड जिल्ह्यात २००९ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेने सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखले होते. वसंत चव्हाण १९७८ साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केले. २००२ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधानपरिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल १६ वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...