सांगली | Sangli
सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. तर दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला या मुद्द्यावरून घेरत महाराष्ट्रातील जनतेची माफी मागण्याची मागणी लावून धरली होती.
हे देखील वाचा : जयदीप आपटेला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “या प्रकरणात…”
त्यानंतर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर (Maharashtra Tour) येऊन गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती. यावरून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींवर प्रश्नांची सरबत्ती करत निशाणा साधला आहे. आज सांगलीत काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
हे देखील वाचा : तापाने दोन मुले हिरावली, आई-वडिलांनी १५ किमीची पायपीट करत मृतदेह खांद्यावर घेत गाठले घर
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, “आज आपण कदमजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. तिथे असताना मी विचार करत होतो की, कदमजींनी ६० वर्षे आपल्यासोबत काम केले. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी ६० वर्षात कधीही माफी मागितली नाही. का मागितली नाही, कारण गरज पडली नाही. हेच सत्य आहे. माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो”, असे म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केले.
हे देखील वाचा : Nashik Crime News : बँक व्यवस्थापकाला ४० लाखांचा गंडा
ते पुढे म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. मी वृत्तपत्रात वाचले की, पंतप्रधान म्हणाले, मी शिवाजी महाराजांची माफी मागतो. मला हे समजून घ्यायचे आहे की, पंतप्रधानांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली? अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण असू शकते की, हा जो पुतळा होता, त्याचे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिले होते. कदाचित पंतप्रधानांना म्हणायचे आहे की, मी हे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला द्यायला नको होते. मी हे कंत्राट गुणवत्तेच्या आधारावर द्यायला पाहिजे होते,असे गांधींनी म्हटले.
हे देखील वाचा : संपादकीय : ५ सप्टेंबर २०२४ – आरोग्याची गुरुकिल्ली
तसेच “दुसरा मुद्दा भ्रष्टाचार, चोरीचा असू शकतो. त्यामुळे त्यांनी माफी मागितली असेल. ज्याला कंत्राट दिले, त्याने भ्रष्टाचार केला, याबद्दल मोदींनी माफी मागितली का? तिसरा मुद्दा हलगर्जीपणाचा असू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची मूर्ती उभारताना इतकीही काळजी घेतली गेली नाही की ती उभी राहील? कदाचित या भावनेतून मोदींनी माफी मागितली असेल”, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीकास्त्र सोडले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा