Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशकाँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयात डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना चेस्ट म्हणजे छातीशी संबंधित स्पेशलिस्ट डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. म्हणूनच त्या नियमित तपासणी आणि उपचारांसाठी वेळोवेळी रुग्णालयात दाखल होत असतात. दरम्यान, मंगळवारी सकाळी त्यांना कोणत्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात प्रतिक्रिया

YouTube video player

रुग्णालयाच्या माहितीनुसार, त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत आहेत. त्याआधीच्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये (IGMC) नेण्यात आले होते. याशिवाय, फेब्रुवारी २०२५ मध्येही त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोनिया गांधी मागच्या अनेक वर्षांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करतायत. नियमितपणे त्यांची तापसणी सुरु असते. उपचारासाठी त्या रुग्णालयात जातात. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पुढील माहिती मिळेल. सगळ्या परिस्थितीवर लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : पोलीस चौकीवर दगडफेक करणारे अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पोलीस चौकीवर (Police Chowki) दगड फेक करून फरार झालेल्या दोघा संशयितांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सीसीसीटीव्हीच्या...