Saturday, May 25, 2024
Homeमुख्य बातम्याSonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

दिल्ली | Delhi

काँग्रेसच्या (Congress ) माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याचे समजते.

- Advertisement -

त्यांना दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात (Sir Gangaram Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

Maratha Andolan : मराठा आंदोलनाचा भडका! सरपंचाने जाळली स्वत:ची कार, ‘एक मराठा, लाख मराठा’च्या दिल्या घोषणा

सोनिया गांधी नुकत्याच मुंबईत झालेल्या इंडियाच्या (I.N.D.I.A) बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. यापूर्वी मार्चमध्येही सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना ताप येत होता.

तापाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या बऱ्या होऊन ती घरी परतल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा त्यांच्यामध्ये तापाची सौम्य लक्षणं आढळली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Maratha Andolan : एक फूल, दोन हाफ यांना आंदोलनाची माहिती नव्हती का?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

- Advertisment -

ताज्या बातम्या