Friday, May 17, 2024
Homeदेश विदेश...तर महिला विधेयकात सुधारणा करु; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा दावा

…तर महिला विधेयकात सुधारणा करु; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचा दावा

जयपुर | Jaipur

‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केंद्रात (If Congress Comes In Power) सत्तेवर आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा (Women Reservation Bill) करेल,’ अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Congress Chief Mallikarjun Kharge) यांनी दिली. ते म्हणाले, की या विधेयकाच्या तत्काळ अंमलबजावणीत कोणतीही मोठी कायदेशीर गुंतागुंत नसताना मोदी सरकार (Modi Government) मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आगामी दहा वर्षे प्रतीक्षा करायला लावणार आहे.

- Advertisement -

परंतु, काँग्रेस सत्तेत येताच या विधेयकात आवश्यक सुधारणा करून तत्काळ अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारवर निशाणाही साधला.

भारताच्या झटक्यानंतर कॅनडाची नरमाईची भुमिका; भारतविरोधी बॅनर्स आणि पोस्टर्स हटवण्याचे आदेश

जयपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करताना खरगे बोलत होते. ते म्हणाले, की संसदेत या विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेसने ते तत्काळ लागू करण्याची मागणी केली होती. तसेच त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी वेगळे आरक्षण असावे, अशी काँग्रेसची मागणी आहे. केंद्रात २०२४ मध्ये आमचे सरकार जेव्हा येईल, तेव्हा आम्ही सर्वप्रथम या विधेयकात तशी सुधारणा करू.

केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींना काय महत्त्व दिले? लोकसभा अधिवेशन पंतप्रधान नव्हे तर राष्ट्रपती बोलावतात. पण राष्ट्रपतींनाच येथे आदराचे स्थान नाही. आम्ही महिलांचा खूप आदर करतो, असा मोदींचा दावा कशाच्या आधारे आहे? संसदेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, कलाकारांसह इतर अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते पण राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हते. हा त्यांचा अपमान आहे. भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक आणले.

Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मधील महत्वाचे मुद्दे

भाजपने निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक आणले. कारण अनेक विरोधी पक्षांनी मिळून ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. जेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि आम्ही मिळून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थापना केली तेव्हा भाजपच्या मनात महिला विधेयक आले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपची कोणतीही महिला अध्यक्ष झाली आहे का? संघाच्या उच्च पदापर्यंत कोणतीही महिला पोहोचली आहे का? काँग्रेस हाच महिलांचा खरा आदर करणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या काळात पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या, विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांत होत्या, मीरा कुमार लोकसभेच्या अध्यक्ष होत्या, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या, असे खरगे यांनी सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या