Tuesday, December 10, 2024
Homeमुख्य बातम्याइंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना...

इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी

भाजपच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली वज्रमुठ बांधलेली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. त्यानुसार मोदी सरकारलासुद्धा मुंबईतील बैठकीतूनच ‘चले जाव’ चा नारा दिला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे दिली.

- Advertisement -

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्व आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात.

चंद्रानंतर आता सूर्य मिशन! आदित्य-L1 या तारखेला झेपावणार; इस्रोने दिली माहिती

या बैठकीला नितिशकुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित असतील. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत.

भाजपकडेच या पदासाठी उमेदवार नाही. नरेंद्र मोदींना जनता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल. पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत ही आमची भावना आहे.

RIL AGM 2023 : मुकेश अंबानींची मोठी घोषणा! रिलायन्स समूहाची जबाबदारी नव्या पिढीकडे; नीता अंबानींचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले ते ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते. मग त्यांनी काय विकास केला ते सांगावे, अशी टीका पटोले यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गातील भ्रष्टाचाराची चौकशी करा

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास १७ वर्षांपासून सुरु आहे. मात्र हा रस्ता पूर्ण होत नाही. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. भाजपचे लोकच या रस्त्याच्या कंत्राटात भागिदार आहेत. कमिशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले आणि त्याचा फटका मात्र कोकणच्या लोकांना बसत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

‘शासन आपल्या दारी’ अभियानावर जनतेच्या पैशाची लूट चालली आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील योजनाच हे सरकार राबवत आहे आणि त्याचे श्रेय मात्र स्वतः लाटत आहे. ज्याठिकाणी हा कार्यक्रम होतो तिथली जनता सरकार बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करते, असेही नाना पटोले म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या