नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले (Nana Patole) तसेच प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष संध्या सव्वालाखे उद्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जागतिक आदिवासी दिन यानिमित्त शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून तसेच शिष्टमंडळांशी चर्चा करणार असल्याची माहिती नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली…
नाना पटोले हे बिरसा ब्रिगेड यांनी आदिवासी समाजासाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये तसेच लकी जाधव यांनी आदिवासी दिनानिमित्त ग्राउंड येथे ठेवलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तडवी भिल्ल समाजातर्फे आयोजित आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला आंबेडकर नगर येथे नाना पटोले भेट देणार आहेत. तसेच नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.
“आघाडीचं इंडिया नाव ठेवलं म्हणजे विजय होणार नाही”; श्रीकांत शिंदेंचे टीकास्त्र
सकाळी 10:30 वाजता नाना पटोले यांचे नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे स्वागत करण्यात येणार आहे. नाना पटोले यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात संघटन बळकटीसाठी त्यांच्या दौऱ्याचा नक्कीच फायदा होईल,असे मत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.
Supriya Sule : “पार्टी विथ डिफरन्स कुठे गेलं? भाजपने ९ वर्षांत…”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल