Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे आज नाशिक...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले तसेच प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.

- Advertisement -

जागतिक आदिवासी दिन यानिमित्त शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून तसेच शिष्टमंडळांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

आ. नाना पटोले दौर्‍यादरम्यान बिरसा ब्रिगेड यांनी आदिवासी समाजासाठी काढण्यात येणार्‍या मोर्चामध्ये तसेच लकी जाधव यांनी आदिवासी दिनानिमित्त ग्राउंड येथे ठेवलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. तडवी भिल्ल समाजातर्फे आयोजित आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला आंबेडकरनगर येथे नाना पटोले भेट देणार आहेत. तसेच नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.

सकाळी 10.30 वाजता आ. पटोले यांचे नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी दिली. आ. पटोले यांच्या दौर्‍यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी काळात संघटन बळकटी करतात त्यांच्या दौर्‍याचा नक्कीच फायदा होईल, असे मत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले व सर्व शहरातील पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष युवक काँग्रेस, एनएसयुआय, महिला काँग्रेस, सेवा दल, इंटक, सर्व फ्रंटल अध्यक्ष, विभाग अध्यक्ष यांनी या दौर्‍यामध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन शहराध्यक्ष आकाश छाजेड व डॉ. तुषार शेवाळे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या