Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविरोधी पक्षनेत्याची निवड कधी? ; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

विरोधी पक्षनेत्याची निवड कधी? ; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

नागपूर | Nagpur

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालेले विरोधी पक्षनेते पदावर अद्यापही कोणत्याही नेत्याची निवड झालेली नाही. विधानसभेच अधिवेशन सुरु होऊन आठवडा झाला आहे मात्र अद्यापही विरोधी पक्षनेता (Opposition Leader) निवडण्यात आलेला नसल्यामुळे हे महत्वाचे पद अद्यापही रिक्तच आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्याने आता या पदावर काँग्रेसकडून (Congress) दावा करण्यात आला आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

काँग्रेस महत्त्वाच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत सभागृहात काम करत आहे. दोन्ही सभागृहात आता आमचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीमध्ये आमच्या हायकमांडने सहकारी पक्षाला विचारून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या निवडीला वेळ लागत आहे. या आठवड्यात यावर नक्की निर्णय होईल असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

इर्शाळवाडीतील आधार गमावलेल्या मुलांसाठी मुख्यमंत्री सरसावले ; घेतला मोठा निर्णय

त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही

यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे, ते म्हंटले, ‘भय आणि भ्रष्टाचार घेऊन भाजप काम करत आहे. आमचे लोक भाजपमध्ये जातील असा दावा ते करत आहेत. भाजपकडून या पुड्या सोडल्या जात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; १०० हून अधिक लोकांची ओळख पटली

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आम्ही केली आहे. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. जनतेने यांना सत्ता देऊन चूक केली. तीन तिघडा काम बिघाड होणारच आहे. शिंदे गटात अस्वस्थता आहे, यावर आम्हाला मत मांडण्याची गरज नसल्याचं’ नाना पटोले यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या