मुंबई । Mumbai
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून जागावाटप, संभाव्य उमेदवार, इच्छुकांची समजूत अशा गोष्टींवर भर दिला जात आहे. एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे प्रचाराची गाणी यायला सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून (NCP) “हक्क मागतोय महाराष्ट्र” हे टायटल साँग लाँच करण्यात आले. यानंतर ठाकरे गटाने घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर ‘मशाल हाती दे’ हे गाणे लाँच केले होते. यानंतर आता काँग्रेसने पॅरेडी गाणे लाँच केले आहे. या गाण्याद्वारे काँग्रेसने महायुतीवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे सध्या हे गाणे तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. महायुतीच्या महान अपयशानंतर सादर करीत आहोत. जाडी चामडी चमकते युतीची लका लका, असे कॅप्शन व्हिडीओला देण्यात आले आहे. या गाण्याची सगळीकडे एकच चर्चा असून या गाण्याला अनेक नेते रिपोस्टही करत आहेत.
भष्टाचार आणि फोडाफोडीची करून लफडी महायुतीची झाली जाडी चामडी असं लिहीत काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांनी ही गाणं रिपोस्ट केलं आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटरपेजवरून ही पोस्ट त्यांनी केली आहे. लका लका लेका लागली लंका, महाराष्ट्रातील भ्रष्टयुती सरकारचे कारनामे उघडकीस आणणारं जाडी चामडी गाणं प्रसारित करतो आहोत असं लिहित काँग्रेसकडून हे गाणं अनेकांनी शेअर, पोस्ट केलं आहे.