Friday, May 31, 2024
Homeनाशिककाँग्रेसला नाशकात 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

काँग्रेसला नाशकात ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

नाशिक | फारुक पठाण | Nashik

कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुमारे ३५०० किलोमीटर पायी प्रवास करुन भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) पूर्ण केली. या काळात त्यांनी लाखो लोकांशी संवाध साधला होता. त्यामुळे पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर चांगलाच बुस्टर मिळाला. त्याचप्रमाणे चालू वर्षाच्या मे महिन्यात देशातील भाजपच्या हातात असलेल्या कर्नाटक राज्याची सत्ता काँग्रेसने खेचल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारल्याचे दिसले. मात्र, या घटनांचा फायदा नाशिकच्या काँग्रेसने (Congress of Nashik) पाहिजे तसा न उचलल्याने पक्षाला अद्याप ‘अच्छे दिन’ची प्रतिक्षा कायम असल्याचे जाणवत आहे…

- Advertisement -

काँग्रेस पक्षाला बुस्टर मिळाल्याने आता महाराष्ट्रावर (Maharashtra) लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या डावपेचांमुळे काँग्रेसला कर्नाटकात विजय मिळविता आला. तेच डावपेच आता महाराष्ट्रात अंमलात आणण्याचा विचार काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असल्याचे दिसते. नाशिक शहर, जिल्ह्यात काँग्रेसला (Congress) आलेली मरगळ आता दूर करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी प्रत्येकाला कठोर परिक्षम घेण्याबरोबरच मानसिकताही बदलावी लागणार आहे. असे मत जाणकार व्यक्त करतात.

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

काँग्रेसच्या विचारधारेतील लोकांमध्ये सध्या एक वेगळा आशावाद पक्षाबद्दल आणि विजयाबद्दल निर्माण झाल्याचे चित्र आहे. विरोधकांबद्दलची नकारात्मकता, खचलेली मनोवृत्ती याला आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकतेला निश्चितच बळ मिळणार आहे. यातून निराश झालेल्यांना देखील बळ मिळणार आहे. तर त्याचा परिणाम आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुकांमध्ये निश्चितच होताना दिसणार. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील आदी तरुणांनी कर्नाटकातील काही विधानसभा मतदारसंघात जाऊन प्रचार केला होता. या अनुभवाची शिदोरीही त्यांच्या पाठीशी असून त्याचा निवडणुकांमध्ये फायदा निश्चितच होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कायम अध्यक्ष हवा

नाशिक शहर व जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, २००९ नंतर पक्षाची पिछेहाट सुरू झाली ती अद्याप कायम असल्याचे दिसत आहे. त्यात पक्षातील अंर्तगत गटबाजीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. आता तर लोकसभा, विधानसभा निवडणुका तोंडावर असतांना देखील नाशिकसारख्या मोठ्या शहरात कायम अध्यक्ष देण्यात आलेले नाही. यामुळे पक्षातीच काही नेते, पदाधिकारी नाराज असल्याचे दिसते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : सदोष मनुष्यवधासह खुनाच्या आरोपाखाली फरार असणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

- Advertisment -

ताज्या बातम्या