Thursday, May 7, 2026
Homeदेश विदेशParliament Session: पंतप्रधानांवर काँग्रेसच्या महिला खासदार हल्ला करण्याच्या योजना आखत होत्या; भाजप...

Parliament Session: पंतप्रधानांवर काँग्रेसच्या महिला खासदार हल्ला करण्याच्या योजना आखत होत्या; भाजप खासदारांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान आज संसदेत एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असूनही त्यांचे भाषण होऊ शकले नाही. ते पुढे ढकलण्यात आले. मात्र या घटनेमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाभोवती घेराव घातल्यामुळेच आपण पंतप्रधानांना सभागृहात न येण्याचा सल्ला दिला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. यामागे सुरक्षेचे अत्यंत गंभीर कारण असल्याचे सांगण्यात येत असून, “काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांवर शारीरिक हल्ला करण्याची योजना आखत होत्या,” असा खळबळजनक आरोप भाजपच्या खासदारांकडून करण्यात आला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, त्या दिवशी लोकसभेत ज्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते, त्यात कोणतीही अप्रिय आणि अनपेक्षित घटना घडू शकली असती, असे सभापती ओम बिर्ला म्हणाले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, असे वर्तन संसदेच्या प्रतिष्ठेच्या आणि लोकशाही नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

- Advertisement -

ओम बिर्ला यांनी सभागृहाला सांगितले की, लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी असे वर्तन पाहिले आहे. ते म्हणाले की, काही सदस्यांचे वर्तन केवळ सभागृहातच नाही तर सभापतींच्या कार्यालयातही संसदीय परंपरेनुसार नव्हते. सभापतींनी याला संसदीय व्यवस्थेवरील काळा डाग म्हटले आणि सांगितले की आतापर्यंत राजकीय मतभेद कधीही सभापतींच्या कार्यालयात नेले गेले नाहीत. त्यांनी सर्व पक्षांना आवाहन केले की मतभेद हे लोकशाहीचा भाग आहेत, परंतु सभागृह सुरळीत चालविण्यासाठी सर्व खासदारांचे सहकार्य आवश्यक आहे.

Loksabha Session: संसदेत २००४ नंतरची पहिलीच अशी घटना, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर न देताच प्रस्ताव मंजूर

सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात असेही सांगितले की जेव्हा पंतप्रधान राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार होते तेव्हा त्यांना काही काँग्रेस सदस्य पंतप्रधानांच्या आसनाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतात अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यांनी सांगितले की त्यांनी सभागृहात असे दृश्य स्वतः पाहिले आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असती. अध्यक्षांनी सांगितले की जर असे घडले असते तर ते देशाच्या लोकशाही परंपरेला मोठा धक्का बसला असता. या भीतीमुळे, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधानांना सभागृहात येऊ नये अशी विनंती केली.

भाजप खासदारांची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, विरोधी पक्षातील अनेक महिला खासदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरल्या आणि पंतप्रधानांच्या खुर्चीकडे पुढे सरकल्या. आमच्या वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांना वारंवार समजावले की, पंतप्रधान येणार आहेत, कृपया आपल्या जागी परत जा; पण त्याकडे दुर्लक्ष केले. सभागृहातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे पंतप्रधान मोदी सभागृहात प्रवेश करू शकले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

ताज्या बातम्या

Shirdi : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले साईदर्शन

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ramnath Kovind) यांनी गुरुवारी (दि.7) सपत्नीक शिर्डी येथे येऊन साईबाबा समाधी मंदिरमध्ये समाधीचे मनोभावे दर्शन (Sai...