Tuesday, May 28, 2024
Homeनगरशिर्डीत युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

शिर्डीत युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

शिर्डी |शहर प्रतिनिधी|Shirdi

राज्यसभेमध्ये शेतकरी बिल मंजूर करण्यात आले ते शेतकर्‍यांच्या विरोधात असल्याने शिर्डी

- Advertisement -

शहरात विधानसभा युवक व विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने मशाल मोर्चा आंदोलन करत जय जवान जय किसान अशा घोषणा दिल्या.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या विरोधात मशाल मोर्चा आंदोलन करण्यात आले. विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा तसेच युवक काँग्रेसचे समन्वयक राजेंद्र बोरूडे यांनी जिल्हाभर आंदोलन छेडले असून शिर्डी विधानसभा मतदार संघात विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन, गोविंद भडांगे आदींसह असिफ इनामदार, असिफ योगेश कामठे, संतोष कांदेकर, आदित्य चव्हाण, अमोल गिरमे, सागर परदेशी, प्रकाश वर्मा इत्यादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिर्डी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात जय जवान जय किसान नारा देत केंद्र सरकारचा निषेध केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या