Tuesday, April 23, 2024
HomeराजकीयBharat Jodo Yatra वर शोककळा, काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराने निधन

Bharat Jodo Yatra वर शोककळा, काँग्रेस नेत्याचे हृदयविकाराने निधन

नांदेड | Nanded

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील केरळ येथून सुरू झालेली भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी नागपूर येथून नांदेडला गेलेले काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्ण कुमार पांडे (Krishna Kumar Pandey) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.

कृष्ण कुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केल्यानंतर त्यांना श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यांना तात्काळ जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ही बातमी भारत जोडो यात्रेतील काँग्रेस नेत्यांना समजताच अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

कृष्ण कुमार पांडे हे मागील पाच दशकापासून काँग्रेस आणि सेवादलमध्ये सक्रीय होते. आंध्र प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्याचे ते प्रभारी होते. सद्यस्थितीत त्यांच्याकडे मध्यप्रदेश ची जबाबदारी होती. दीड वर्षापूर्वी त्यांचे पुत्र धीरज यांचे कोरोनाने निधन झाले झाले होते. धीरज युवक काँग्रेसचे सचिव होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या