धुळे Dhule। प्रतिनिधी
आम्ही तीन पिढ्यापासून (three generations) काँग्रेस पक्षाची (Congress party) निष्ठने सेवा (Serve with devotion) करीत आहोत. आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. अनेक त्रास आणि विरोध सहन (Many difficulties and opposition) करावा लागला तरी चालेल परंतू आम्ही कधीही काँग्रेसला सोडून (Congress will not be left) जाणार नाहीत. राज्यात आणि देशात परिवर्तनाची लाट आली आहे. राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो पदयात्रेला (Add India to the Padayatra) प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आ. कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी सांगितले.
आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धाडरे येथे बोरी नदीवर पुलाचे बांधकाम मंजुर करण्यात आले होते. या पुलाच्या कामाचे आज दि.11 सप्टेंबर रोजी आ.पाटील यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. आ. पाटील यांनी पुलाच्या कामासाठी एकूण चार कोटी 79 लाख रुपयाचा निधी मंजुर केला आहे. या पुलामुळे आर्वीपासून ते शिरुडपर्यतच्या धाडरा, धाडरी, कुळथे या परिसरातील गावांची सोय होणार आहे.
पुढे बोलतांना आ. पाटील म्हणाले की, माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी तालुक्याती ऐतिहासिक कामे केली. त्याच दिशेने आपण करीत आहोत. विविध खात्यातून निधी आणून विकासाची कामे गतीने करीत आहोत. सरकार बदलल्याने धुळे तालुक्यातील अनेक कामे शिंदे सरकारने स्थगित केली. मात्र तालुक्याच्या विकास व्हावा म्हणून निधीसाठी संघर्षही करण्याची आपली तयारी आहे.त्यामुळे कोणत्याही विरोधातील शक्ती आपला विकास थांबवू शकणार नाही.
माजी खा. स्व. चुडामण आण्णा, माजी मंत्री रोहिदास पाटील आणि मी अशा आमच्या तीन पिढ्या काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे राहिलो आहेत. आमच्या रक्तातच काँग्रेस पक्ष असल्याने कधीही काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही. कितीही विरोध झाला आणि त्रास सहन करावा लागला. तरी काँग्रेस हेच आपले शेवटपर्यंत ध्येय राहिल. सामान्य जनता महागाईला, दडपशाहीला कंटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या पदयात्रेमुळे देशात परिवर्तन होत आहे. असाही विश्वास आ. कुणाल पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी विनोद बच्छाव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी पं. स. सभापती भगवान गर्दे, कार्यकारी अभियंता सौ. घुगरी, माजी सरपंच संतोष पाटील, सरपंच धनुबाई अहिरे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, सुतगिरणी संचालक पंढरीनाथ पाटील, बापू खैरनार, आर्वी सरपंच नागेश देवरे, सामाजिक कार्यकर्ते शशि रवंदळे, अॅड.बी.डी.पाटील, निमगुळ सरपंच पांडूरंग मोरे, पं.स.सदस्य दिलीप देसले, विनोद बच्छाव, गोकुळसिंग राजपुत, मन्साराम जाधव, योगेश जाधव, भरत पाटील, अजय सुर्यवंशी, डॉ.चंद्रकांत पाटील, अनिल जाट, सतिष पवार, सी.यु.पाटील, तुकाराम गर्दे, भास्कर पवार, जगदिश शेठ, भिला पाटील, जगदिश पवार, नितीन पाटील, संजय पवार, माजी सरपंच चंदा पवार, सोनू पवार, नाना पवार, मनोज पवार, ईश्वर पवार, भाऊसाहेब सोनवणे, नंदु मोरे आदी उपस्थित होते.