नाशिक | Nashik
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave) पार्श्वभूमीवर बालके बाधित होण्याची (Child Patient) भीती व्यक्त केली जात आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात (Bitko Hospital) नुतन चाईल्ड वॉर्ड (Child Ward) ची उभारणी करण्यात आली आहे. या चाईल्ड वॉर्डला नुकतीच पालकमंत्री भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी भेट देत पाहणी केली.
यावेळी आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire), महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav), वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, चाईल्ड वॉर्डच्या प्रमुख डॉ. कल्पना कुटे, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या चाईल्ड वॉर्ड ची रचना व चित्रांची रंगसंगती उत्तम आहे. या वार्डात एकूण शंभर बेडची (Hundred Bed) व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरची देखील सुविधा असून इतर सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत.
यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सिटी स्कॅन मशिनचे (City Scan Machine) उदघाटन केले.