Wednesday, October 16, 2024
Homeनाशिकमहावितरण ठेकेदाराची मनमानीमुळे ग्राहक त्रस्त

महावितरण ठेकेदाराची मनमानीमुळे ग्राहक त्रस्त

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहरातील वीज समस्यांबाबत (Power issues) विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता रमेश सानप (Ramesh Sanap, Superintendent Engineer, Power Distribution Company) यांना आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीच्या वतीने निवेदन (memorandum) देण्यात आले.

- Advertisement -

शहरात वीज वितरण कंपनीच्या (Power Distribution Company) वतीने नेमण्यात आलेल्या खाजगी ठेकेदाराकडून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीचा मनमानी कारभार सुरू असून वीज वितरण चांगल्या प्रकारे केले जात नाही. खाजगी कंपनीला वीज वितरण कंपनीच्या वतीने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन होताना दिसत नाही. शहरात बहुतांश उद्योगधंदे वीजेवर अवलंबून असून वीज वितरण कंपनीच्या खाजगी ठेकेदाराकडून ग्राहकांना होत असलेल्या त्रासाचा परिणाम दैनंदिन जीवन व व्यवहारांवर होत असल्याचे निवेदनात (memorandum) म्हटले आहे.

वीजपुरवठा (Power supply) वारंवार खंडित होत असून वीजपुरवठा खंडित करण्याअगोदर पूर्वकल्पना दिली जात नाही. पावसाळा (rainy season) सुरू होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न केल्याने वेळोवेळी वीजपुरवठा खंडित (Power outage) होत असून त्यामुळे अती संवेदनशील मालेगाव (malegaon) शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. अंधाराचा फायदा घेऊन चोरी, छेडखानी, वाहन चोरी तसेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियोजनाच्या अभावामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीचा टोल फ्री क्रमांक लागत नाही, लागला तर बहुतांश वेळी उचलला जात नाही.

उचलला तर अगोदर ग्राहक क्रमांक मागितला जातो. बर्‍याचश्या ग्राहकांना ग्राहक क्रमांक कळतच नाही. कुणी ग्राहक क्रमांक सांगितलाच तर बिल भरलेले नसल्यास तक्रार घेतली जात नाही. कंपनीतर्फे विभागवार कार्यालयांची निर्मिती करून तेथील जबाबदार अभियंत्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक ग्राहकांना पुरवले गेलेले नाहीत. कॉल सेंटर केवळ नावालाच कार्यान्वित केले असून त्याचा कोणताही उपयोग ग्राहकांना होताना दिसत नाही. अनुभवी लाईनमन नसल्याने कामकाज सुरळीत सुरू नाही. वीजजोडणी वेळेत मिळत नाही, ती देण्यासाठी अवाजवी खर्च घेतला जातो.

जुन्या लाईन्स बदलल्या गेल्या नाहीत. काही ठिकाणी कॉपरच्या चांगल्या तारा काढून त्या ठिकाणी अल्युमिनियमच्या तारा टाकल्या जात आहेत. त्यात शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे जाणवते. काही खांब खराब झाले असून ते बदलले नाहीत. रस्त्यात व वाहतुकीस अडथळा ठरणारे खांब स्थलांतरीत केले गेले नाहीत. त्यामुळे वाहने खांबांवर आदळून वीजपुरवठा खंडित होतो. सध्या अचानक वीज बिलात मोठ्या प्रमाणावर वाढ केलेली दिसत असून वीज मिटर वार्षिक सरासरीपेक्षा जास्त युनिट वीज वापर दिसायला लागले आहे.

त्यामुळे ग्राहकांच्या मनात गडबडीची शंका निर्माण होत असून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मिटर तपासणी करून देण्याची गरज आहे. वीज वितरण कंपनीच्या वतीने नेमण्यात आलेले खाजगी ठेकेदार ग्राहकांना योग्य सेवा देण्यात निष्क्रीय ठरले आहेत, आदी त्रुटी निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर अहवाल शासनास सादर करत खाजगी ठेकेदार कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी व उपरोक्त समस्या दूर कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

याबाबत अधीक्षक अभियंता सानप यांनी नोडल अधिकारी कुमावत, कंपनीचे व्यवस्थापक सिंघ, प्रकाश चंदन यांना सूचना देत तात्काळ टोल फ्री क्रमांकाबाबतची तक्रार, दुरुस्ती करण्याबाबतची स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची सूचना केली. तसेच वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी मनुष्यबळ वाढवून उपाययोजना करण्याबाबत आदेश दिले. यावेळी निखिल पवार, देवा पाटील, सुशांत कुलकर्णी, विवेक वारुळे, प्रवीण चौधरी, दादा बहिरम, कपिल डांगचे, गोपाल सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या