Saturday, June 15, 2024
Homeनगरकंटेनर-दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

कंटेनर-दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार

तळेगाव दिघे | वार्ताहर| Talegav Dighe

- Advertisement -

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या संगमनेर ते कोपरगाव रस्त्यावर (Sangamner Kopargav Road) तिगाव फाटा शिवारात मालवाहू कंटेनर आणि दुचाकीची धडक (Container Hit Bike) होत झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. अक्षय बाबासाहेब पाचोरे (वय २३ वर्ष रा. शहापूर ता. कोपरगाव) असे अपघाती मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. शनिवारी (दि. १) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही भीषण अपघाताची (Accident) घटना घडली.

तळेगाव दिघे मार्गे असलेल्या संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने (Sangamner Kopargav Road) अक्षय बाबासाहेब पाचोरे हा युवक दुचाकीवरून (क्र. एमएच १७ सीवाय ८६७०) संगमनेरच्या दिशेने प्रवास करीत होता. तो तिगाव फाटा परिसरात आला असता दरम्यान समोरून आलेल्या आणि कोपरगावच्या दिशेने चाललेल्या मालवाहू कंटेनरची (क्र. एचआर ३८ यु ३९३८) धडक होत भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार अक्षय बाबासाहेब पाचोरे हा कंटेनरच्या चाकाखाली चिरडून जबर मार लागल्याने जागीच ठार (Death) झाला. अपघाताची माहिती समजताच दत्तात्रय पाचोरे, प्रसाद नवले तसेच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य केले.

मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ली. त्यानंतर  मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. अपघाताच्या घटनेनंतर कंटेनर चालक पसार झाला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे (Sangamner Taluka Police Station) पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या