मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत सोयगाव येथील महिला ठार झाली. महामार्गावरील सायणे खुर्द शिवारात हा अपघात झाला.
- Advertisement -
ज्योती सिद्धार्थ आहिरे (२२, रा. आंबेडकर चौक, सोयगाव) ही महिला आपल्या नातेवाईका समवेत (एमएच.१५ एएफ ४५८१ ) या दुचाकीने जात होत्या. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या धडकेत ज्योती आहिरे या रस्त्यावर पडून गंभीर जखमीं होऊन मयत झाल्या.
या प्रकरणी प्रकाश गंगाराम बोराळे (५७, रा. जळकू ता. मालेगाव) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अपघातानंतर वाहनासह पसार झालेल्या कंटेनर चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो.हवा. खुरासणे हे तपास करीत आहेत.