Saturday, May 4, 2024
HomeनाशिकVideo : अमित शहांचा मुंबई दौरा; ट्राफिक अडवली पिंपळगावला?

Video : अमित शहांचा मुंबई दौरा; ट्राफिक अडवली पिंपळगावला?

निफाड | प्रतिनिधी | Niphad

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर (Pimpalgaon Baswant toll booth) मध्यरात्री बारा वाजेपासून थांबविण्यात आल्याचे समजते…

- Advertisement -

Atiq Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी! अतीक अहमदवर गोळी झाडणारे ते हल्लेखोर कोण?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा दौरा असल्याने कंटेनर व अवजड वाहनांना थांबविण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच अचानक ट्राफिक थांबाविल्याने अनेक चालक व वाहकांचे हाल होत असून पोलीस प्रशासनाकडून मात्र कुठलीही अधिकृत माहिती दिली जात नाही. त्यामुळे वाहतुकीचा (Transport) पुरता फज्या उडाला आहे.

तसेच धुळ्याहून येणारी सर्व अवजड वाहने पिंपळगाव टोलनाक्यावर थांबविण्यात आली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे अमित शहा यांचा दौरा मुंबईत (Mumbai) असताना पिंपळगावला ट्राफिक थांबविण्याचे कारण काय, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या