Saturday, May 18, 2024
Homeजळगावउघड्यावर फेकलेले प्रदूषित मास्कमुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका!

उघड्यावर फेकलेले प्रदूषित मास्कमुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका!

जळगाव । प्रतिनिधी

कोरोनापासून (Corona) संरक्षण करण्यासाठी मास्कचा (Mask) मोठ्या प्रमाणावर वापर वाढलेला आहे. मात्र, काहींकडून या मास्कचा वापर झाल्यानंतर उघड्यावर, रस्त्यात फेकून देत असल्याचे चित्र आहे. आपल्या श्वासाने ते दूषित (Contaminated) झालेल्या व पर्यावरण विघातक (Environmentally destructive) असलेल्या या मास्कला मसाचा वा अन्नपदार्थ समजून पक्षी त्यांना उचलत आहेत. त्यामुळे हा दूषित व पर्यावरण विघातक पॉलीप्रोपेलिन मास्क (Polypropylene mask) पक्ष्यांच्या (bird health) आरोग्याला घातक (Harmful) ठरत आहे. त्यामुळे मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावू या. मानवासोबतच आपण पक्ष्यांच्या जीवाची काळजी घेऊ या आणि त्यांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेऊ या, असा संदेश पर्यावरण व पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ (Bird friend Rajendra Gadgil) यांनी दिला आहे.

- Advertisement -

पर्यावरणीय प्रश्नही निर्माण होणार

मास्क पॉलीप्रोपेलिनचे बनलेले असतात. या पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे उघड्यावर फेकल्यानंतर तो पॉलिथिन सारखाच लवकर नष्ट न होता वर्षानुवर्षे टिकतो.त्यामुळे मास्कची योग्य विल्हेवाट न लावल्यास आपण पर्यावरणीय प्रश्नही निर्माण करणार आहोत.यासाठी वापरण्यात येणारे इलॅस्टिकसुद्धा प्लास्टिकचाच प्रकार आहे.त्याचेही विघटन होणे कठीण आहे. हा लवकर नष्ट न होता वर्षानुवर्षे टिकतो. त्यामुळे पर्यावरण विघातक आहे. उघड्यावर फेकलेले मास्कला मसाचा तुकडा,अन्नपदार्थ समजून पक्षी त्यांना उचलत आहेत. त्यामुळे मास्क पक्ष्यांच्या आरोग्याला घातक ठरणार नाही याची काळजी घ्या व मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावा,असा संदेश पक्षीमित्र गाळगीळ यांनी दिला.

मास्कची सुरक्षित विल्हेवाट कशी लावाल?

वापरलेल्या मास्कला पाण्यात 5 % ब्लिचिंग पावडर मिसळून तयार केलेल्या द्रवात 5 ते 10 मिनिट निर्जंतुक करा. मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका. किंवा 1% सोडियम हायपोक्लोराइट आणि पाण्याचे द्रव वापरून त्यात मास्क निर्जंतुक करून मग कागदात गुंडाळून डस्टबिनमध्ये टाका. जर घराजवळ तुमच्या मालकीची मोकळी जागा असेल तर त्यात खोल खड्डा करून त्यात मास्क जमिनीत गाडून द्यावे. सर्वात सुरक्षित पद्धत म्हणजे वापरलेले मास्क सुरक्षितरित्या जाळावे.

उघड्यावर फेकलेले प्रदूषित मास्कपासून पक्ष्यांच्या जीवाला धोकादायक आहे. त्यामुळे सावधानता बाळगून रस्त्यावर मास्क फेकू नका. वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावा.

राजेंद्र गाडगीळ, पक्षीमित्र

- Advertisment -

ताज्या बातम्या