Sunday, July 5, 2026
Homeक्राईमParner : कॉन्ट्रॅक्ट वादातून एचआर हेडला मारहाण

Parner : कॉन्ट्रॅक्ट वादातून एचआर हेडला मारहाण

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा येथील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या वादातून कंपनीच्या एच.आर. हेड महाडीक यांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैभव रामदास रिकामे (वय 25, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) याला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव रामदास रिकामे याने सतीश मोहन भालेकर यांच्या सांगण्यावरून कंपनीच्या एच.आर. हेड महाडीक यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी संपर्क साधला होता. मात्र कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याने आरोपींनी राग मनात धरून दि. 26 मे 2026 रोजी रुईछत्रपती फाटा परिसरात महाडीक यांची मोटरसायकल अडवून सतीश मोहन भालेकर (वय 42, रा. वडनेर हवेली, ता. पारनेर), वैभव रिकामे, अविनाश बोरकर (रा. वाडेगव्हाण), बादल आडे, तसेच चार विधिसंघर्षित बालकांनी त्यांना मारहाण केली तसेच सुपा एमआयडीसीत कामाला यायचे नाही अशी धमकी दिली.

त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी वैभव रिकामे याला अटक केली असून दोन विधीसंघर्षित बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. उर्वरित आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...