Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajya Sabha : काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ

Rajya Sabha : काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ

दिल्ली । Delhi

संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. त्यातच राज्यसभेत मोठी खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. सभापतींनी स्वतः या घटनेची माहिती सभागृहात दिली. त्यांनी म्हटले आहे की ही गंभीर घटना आहे, याची चौकशी केली जाईल.

YouTube video player

शुक्रवारी राज्यसभेचे कामकाज सुरु झाले. तेव्हा, राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी नोटांचे बंडल सापडल्याची माहिती सभागृहाला दिली. सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तपासणीत सीट क्रमांक २२२ खाली नोटांचे बंडल सापडले. हे सीट काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचे आहे. सिंघवी हे तेलंगणातून राज्यसभा सदस्य आहेत. या घटनेची नियमांनुसार चौकशी झाली पाहिजे, आणि ते होईल असे सभापतींनी सभागृहाला सांगितले.

दरम्यान, याप्रकरणी अभिषेक मनु सिंघवी यांनी याप्रकरणाचा खुलासा करताना ही रोख रक्कम आपली नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्याकडे फक्त ५०० रुपयांची नोट होती. मी १२.५७ वाजता सभागृहात पोहोचलो आणि तेथून १ वाजता निघालो, त्यानंतर मी १.३० वाजता कॅन्टीनमध्ये बसलो आणि त्यानंतर मी संसदेतून बाहेर पडलो, असं त्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस शिपाई पदांसाठी उच्चशिक्षित मैदानात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गाच्या 73 रिक्त पदांसाठी होणार्‍या भरती प्रक्रियेस 11 फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून 14 फेब्रुवारीपर्यंत मैदानी...