Monday, November 25, 2024
Homeमनोरंजन‘हर हर महादेव’वरून रणकंदन; राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने, संभाजी ब्रिगेडही आक्रमक

‘हर हर महादेव’वरून रणकंदन; राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने, संभाजी ब्रिगेडही आक्रमक

मुंबई | Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. पण काही दिवसात सिनेमाला कडाडून विरोध होतोय. तर आता दुसरीकडे हर हर महादेव हा सिनेमा देखील वादाच्या भोवऱ्यात आला आहे.

- Advertisement -

‘हर हर महादेव’ या मराठी सिनेमावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. ठाण्यात एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’चा शो बंद पाडला तर दुसरीकडे मनसेचे अविनाश जाधव यांनी शो पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. यादरम्यान, मनसेचे अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात बाचाबाची देखील झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने ठाण्यासह अनेक चित्रपटगृहातील शो बंद पाडले. सिनेमागृहात बसून असलेल्या प्रेक्षकांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्याने किरकोळ वादाचे प्रसंगही घडले. त्यात एका प्रेक्षकाला मारहाणही झाली. मात्र काही वेळानंतर मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी हा राष्ट्रवादीने बंद पाडलेला शो पुन्हा सुरु केला. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी याबाबत बोलताना संताप व्यक्त केला.

तर पुण्यात संभाजी ब्रिगेडदेखील आक्रमक झाली आहे. मंगला चित्रपटगृहातील ‘हर हर महादेव’ चित्रपट बंद पाडून त्याचे पोस्टर चित्रपटगृहातून काढून टाकण्यात आले आहेत. त्याचसोबत चित्रपटगृह मालकांना पुन्हा चित्रपट प्रदर्शित केला तर चित्रपटगृहातील पडदे फाडू असा इशारा ही देण्यात आला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या