Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला विक्रमी भाव

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला विक्रमी भाव

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

आज रविवार दिनांक .०८ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीतपार पडलेल्या लिलावात गावठी कोथिंबीरला किमान सहा हजार पाचशे रुपये तर सर्वाधिक चाळीस हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळाला.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर,दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून. पालेभाज्या व फळ भाज्यांची आवक होत आहे. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबाद कडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात हा स्थानिक विक्री साठी व्यापारी खरेदी करत असतात.

पालेभाज्यांची आवक सद्यःस्थितीत घटली आहे. यामुळे बाजारभाव वधारले आहेत . बाजार समितीत रविवार (ता.०८ ) रोजी झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर किमान ,६५रुपये जुडी ते सर्वाधिक ४०० रुपये जूडी,चायंना कोथिंबीर किमान ४० तर सर्वाधिक २८० रुपये जूडी, मेथी किमान ५० तर सर्वाधिक १३० रुपये जूडी, शेपू किमान २२ तर सर्वाधिक ५७ रुपये जूडी, कांदापात किमान १५ तर सर्वाधिक ४२ रुपये जूडीला भाव मिळाला आहे. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर,मेथी,शेपू, कांदापात यांची झूडी छोटी करून डबल बाजार भावाने विक्री होत आहेत.

दिवसभर पाऊस उघडला होता .बाजार समितीत २०५ जुड्या गवाठी कोथिंबीर घेऊन आलो होतो. शेकडा चाळीस हजार रुपये सर्वाधिक भाव मिळाला. त्याप्रमाणे मला ८२ हजार रुपये मिळाले. कोथिंबिरीचे उत्पादन सुरू असल्यापासून पहिल्यांदाच एवढा बाजार भाव मिळाला.

दिगंबर बोडके; सायखेडा गाव, ता.निफाड जि.नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या